मालवणी बोली साहित्य संमेलन..

मालवणी_बोली_साहित्य_संमेलन

मित्रानो आणि मैत्रिणींनो नमस्कार..

भाषा हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. आपली प्राथमिक ओळख मुख्यतः: आपल्या भाषेमुळे होते. महाराष्ट्रात राहणारे आपण आपल्या अनेक वैशिष्ट्यांमुळे ओळखले जातो, त्यापैकी एक वैशिष्ट्य आहे आपली मराठी भाषा. मराठी महाराष्ट्राची राजभाषा आहे. ती आपली प्रमाण भाषाही आहे. ती आपली मातृभाषाही आहे.

आपल्या १३५ कोटी लोकसंख्येच्या आणि अनेक भाषांच्या देशांत, मराठी ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. तर जगात सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांत मराठीचा क्रमांक लागतो १८ वा. मराठी भाषा ही जगात १८ क्रमांकावर आहे. तर भारतातील आता तिसऱ्या क्रमांची भाषा आहे. ती आपल्या ‘मराठी’ आपल्या महाराष्ट्राची प्रमाण भाषा ‘मराठी’ आहे. आपल्यापैकी बहुतेकांची ती मातृभाषाही आहे.

मराठीला हा मान काही आज मिळालेला नाही. अनेक स्थित्यंतरातून जात, अनेक आव्हान पेलून तिला आज हा मान मिळालेला आहे. मराठी हि देशातली आणि जगातली एक महत्वाची भाषा बनण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे मराठीच्या विविध बोली. मराठीला समृद्ध केलय, ते तिच्या विविध भागात, विविध जातीत बोलल्या जाणाऱ्या प्रादेशिक बोलींनी. बोली म्हणजे महाराष्ट्राच्या विविध प्रांतात, गावा-गांवांत रोजच्या बोलण्यात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा. जसे की वऱ्हाडी, नागपुरी, हळबी, अहिराणी, झाडीबोली, डांगी, कोकणी इत्यादी. अशा विविध प्रादेशिक बोली म्हणजे मायमराठीच्या लेकीसुनाच आहेत. या प्रादेशिक बोलींप्रमाणेच चित्पावनी, देशस्थ, कुणबी अशा विविध जातिनिविष्ट बोलींचाही वेगळेपणा मराठीच्या विविधतेशी संबंधित आहे. प्रमाण मराठीला शब्दांचा अविरत पुरवठा करून तिला समृद्ध करत असतात, त्या तिच्या या बोलीभाषा. अशाच बोलीभाषेतली बोली एक बोलीभाषा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी आपली ‘मालवणी’..!

सिंधुदुर्गात मालवणी आजही मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. व्यक्ती कितीही मोठी असो, कोणत्याही उच्च पदावर असो, ती सिंधुदुर्गातील दुसऱ्या व्यक्तीशी बोलतां मालवणीचाच आधार घेते. दोन मालवणी माणसं आपसात बोलताना मालवणीचा वापर करताना तर आता मुंबईतही दिसतात. कोणतीही लाज बाळगली जात नाही आणि हे चांगलं लक्षण आहे. आपल्या आईची बोली बोलायला लाज कसली? त्यासाठी सर्व मालवण्यांना १०० टक्के मार्क्स..!

कोणतीही भाषा अभिमानाने तेंव्हाच बोलली जाते, जेंव्हा तिला प्रतिष्ठा लाभते. आपल्या भाषेला, आपल्या बोलीला प्रतिष्ठा देण्याचे काम कुणी बाहेरून येऊन करणार नाही, तर ते आपलं आपल्यालाच करावं लागत. मालवणीला जगात प्रतिष्ठा मिळवून देणारे असेच तिचे दोन पुत्र मालवणात जन्मले. श्री. गंगाराम गवाणकर आणि मच्छिन्द्र कांबळी. श्री. गंगाराम गवाणकर यांच्या लेखणीतून जन्मलेलं आणि तेवढ्याच ताकदीने मच्छिन्द्र कांबळी यांनी सादर केलेल्या ‘वस्त्रहरण’ ह्या मालवणी नाटकाणे मलावणीला जागतिक परिमाण मिळवून दिल. मालवणी ही मराठीची महत्वाची बोली समजली जाऊ लागली, ती तेंव्हापासून. त्यांचा हा वारसा पुढे त्याच जिद्दीने चालवणारे अनेक नाटककार, साहित्यिक नंतरच्या काळात निर्माण झाले आणि आजही हे काम अत्यंत धडाडीने सुरु आहे. एक मालवणी म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो की माझे मालवणी झील आणि चेडवा ते काम अत्यंत उत्तम प्रकारे करत आहेत.

त्यादिशेने आणखी एक पुढचं पाऊल म्हणून ‘मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग’ आणि ‘सिंधुदुर्ग प्रतिष्ठान’ या दोन नोंदणीकृत संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून, मुंबईत पुढच्या रविवारी, म्हणजे दिनांक २३ जून २०१९ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या वेळेत, ज्येष्ठ साहित्यिक श्री. प्रभाकर भोगले यांच्या अध्यक्षतेखाली ‘मालवणी बोली साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आलं आहे. मालवणी भाषेचं हे सहावं संमेलन.

मालवणी बोलीतील विविध कलाप्रकार, साहित्य यावर या संमेलनात चर्चा होणार आहे. माल्वणींच्या वाढीसाठी काय करता येईल, या संबंधीची या संमेलनात चर्चा होणार आहे. मालवणी भाषेत साहित्य निर्मिती करणारे साहित्यिक, कवी त्याचप्रमाणे मालवणी मुलखातील कला, चित्र, शिल्प, नाट्य इत्यादी क्षेत्रातले दिग्गज या संमेलनात सहभागी होणार आहेत. या सर्वाना पाहण्याची, त्यांना ऐकण्याची, त्यांच्याशी बोलण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने आपल्याला मिळणार आहे. संमेलनाची संपूर्ण माहिती सोबतच्या चित्रांमध्ये दिलेली आहे.

मला आपल्या देशातील सगळ्याच भाषा आवडतात. सगळ्या सारख्याच गोड आहेत. प्रत्येक भाषेला आपलं आपलं एक वैशीष्ट्य आहे. माझं त्या सगळ्याच भाषा/बोलींवर प्रेम आहे. परंतु मालवणी माझी मायबोली. तिच्यावर माझं काकणभर जास्तच प्रेम आहे. मावश्या आवडतात सगळ्यांनाच, तरीही रात्री आपल्याला कुशीत घ्यायला आईच लागतेनं, तसच काहीस आहे हे. हे सांगण्याचं कारण की आपल्या मायबोलीच्या या गौरव सोहळ्यासाठी, केवळ मालवणीत नव्हे, तर या भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वच भाषिक लोकांनी या सोहळ्यासाठी आवर्जून यावं.

येवा सगळ्यांनी, आमी तुमची वाट बघतव..

येशात मां ?

– नितीन साळुंखे

९३२१८११०९१

१५.०६.२०१९

#मालवणी_बोली_साहित्य_संमेलन

दिनांक २३ जून २०१९ रोजी

सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत.

संमेलनाच ठिकाण –

नायर सभागृह , स्वामीनारायण मंदिरामागे,

दादर (पूर्व), मुंबई – ४०० ०१४.

सदर संमेलन सर्वांसाठी निःशुल्क असून प्रवेश, भोजन व चहा-पाणी ही पूर्ण व्यवस्था निःशुल्क ठेवण्यात आली आहे.

संपर्क –

१. प्रकाश सरवणकर – 98692 80660

2. हेमंत पवार – 90290 97975

#विनम्र_आवाहन

‘सिंधुदुर्ग प्रतिष्ठानने तरीही एवढं मोठं कार्य पार पाडण्याच आव्हान स्वीकारला आहे. तरीही त्यासाठी पुढे मदतीच्या हातांची आवश्यकता आहे. .

कोणत्याही भाषेला जगवायचे, समृद्ध करायचं काय, ती भाषा बोलणाऱ्या किंवा त्या भाषेवर मनापासून प्रेम करणाऱ्या तिच्या पुत्र-पुत्रीच असत. मलावणीचीही आपल्याकडून हीच अपेक्षा आहे.

मालवणी बोली भाषेच्या संवर्धनासाठी सिंधुदुर्ग प्रतिष्ठान करत असलेल्या या कार्यात आपणही आपला खारीचा वाटा उचलावा, असं प्रतिष्ठानने आवाहन करत आहे.

या उपक्रमासाठी स्वेच्छा देणगी देऊ इच्छित व्यक्तींनी ‘सिंधुदुर्ग प्रतिष्ठान’च्या पुढील नोंदणीकृत बँक खात्यावर आपली देणगी पाठवावी ही विनंती..देणगीदारांना रीतसर पोचपावती देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

धन्यवाद’

– सिंधुदुर्ग प्रतिष्ठान

कार्यकारी मंडळ

BANK A/C NAME: SINDHUDURG PRATISHTHAN

BANK A/C NO. 131100100101535

IFSC Code: SRCB0000131

THE SARASWAT CO-OPERATIVE BANK LTD

Branch: BORIVLI (EAST)