एक आवाहन- An Appeal..

एक आवाहन-

आपल्या धाकट्या भावंडांच्या शिक्षणासाठी

चिमूटभर किंवा मुठभर मदतीचं..

समर्थ रामदास स्वामी एकदा प्रवासात असताना एका घराकडे थांबतात.घरातली स्त्री त्याचं चांगलं आगत स्वागत करते.थोड्या गप्पा गोष्टी होतात आणि मग समर्थ जायला निघतात.

काहीश्या अपराधी भावनेने ती स्त्री समर्थांना नमस्कार करते आणि म्हणते की,स्वामी क्षमा असावी आज आपल्या झोळीत टाकायला माझ्याकडे काहीच नाही.

तेव्हा समर्थ तिला सांगतात, “काही नाही असं कसं? तू तुझ्या तुळशीतली चिमुटभर माती माझ्या झोळीत टाक”

तेव्हा आश्चर्याने ती म्हणते, “महाराज ‘माती’ हे दान कसं असू शकतं?”

समर्थ, “आज तुझ्याकडे माती आहे, उद्या सोनं असेल. तू काय देतेस हे फारसं महत्वाचं नाही, पण तू काहीतरी देतेस हे महत्वाचं.”

ही गोष्ट आठवायचं खास कारण म्हणजे, आपल्या ‘दै. तरुण भारत’चा सुरु झालेला ‘यांचा आनंद १००%’ हा उपक्रम..!

गेली १३ वर्षे ‘दै. तरुण भारत’ हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं प्रतिष्ठीत वर्तमानपतून, ‘परिस्थिती गंभीर, पण मन खंबीर’ असलेल्या हुशार विद्यार्थ्यांना समाजापुढे आणण्याच काम सातत्यानं करत आहे.

त्यानंतर गेल्या सात वर्षापासून ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ने या उपक्रमाशी स्वत:ला जोडून घेतलं आणि अश्या हुशार परंतु गरीब विद्यार्थ्यांना, ठाण्याच्या ‘विद्यार्थी विकास निधी’चे प्रमुख श्री.रविंद्र कर्वे यांच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याचा उपक्रम सुरु केला.

दोन वर्षांपूर्वी *’आम्ही बॅचलर’* या ग्रुपची याच उद्देशाने स्थापना झाली आणि आम्ही बॅचलर, तरुण भारत, भगीरथ प्रतिष्ठानने या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न सुरु केला. परिणामी पहिल्या वर्षी एक लाखाहून अधिक आणि गेल्या वर्षी दोन लाखाहून अधिक आर्थिक सहाय्य यासाठी जमा होऊन, ते विद्यार्थ्यांना वितरीत केलं गेलं.

या उपक्रमाचं आपण ‘आम्ही बॅचलर गृप स्कॉलरशिप’ असं नामकरण केलेलं असून, या उपक्रमाचे पूर्ण व्यवस्थापन सांभाळणाऱ्या *भगीरथ प्रतिष्ठान’च्या नांवाने यासाठी बँकेत एक खास खातं उघडण्यात आलेलं आहे. या उपक्रमाची प्रत्येक वर्षीची सांगता करताना, हे खातं ‘झिरो ब्यालंस’ करण्यात येतं आणि दरम्यान जमा होणारा संपूर्ण निधी ‘यांचा आनंद १००%’ या ‘दै.तरुण भारत’च्या सदरातुन प्रकाशात येणाऱ्या विद्यार्थ्यांना *’स्कॉलरशिप’* म्हणून वितरीत केला जातो.

मी मुंबईत राहाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझ्या सहृदय मित्रांना, जिल्ह्यातील आपल्या धाकट्या भावंडांना मदत करण्याचं आवाहन करतो. ज्यांना चिमूटभर देण शक्य आहे त्यांनी चिमूटभर आणि ज्यांना मुठभर देणं शक्य आहे त्यांनी मुठभर अवशॅय द्यावं.

चिमुटभर असो वा मुठभर, त्याची पावती मात्र मिळणारच..!

माझ्या मित्रांच्या दातृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे.

-नितीन साळुंखे

9321811091

#बॅंक_खात्याचा_तपशील

खात्याचे नाव- भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान

खाते क्रमांक _- 149410110002217

बँकेचे नाव – Bank of India, झाराप शाखा

IFSC कोड – BKID0001494

इमेल आयडी – bhagirathgram@gmail.com

जिल्ह्यातले प्रतिनिधी – श्री. प्रभाकर सावंत.

(9422373855).